Wednesday, 3 August 2016

झुळूक

झुळूक एक वार्‍याची अचानक घरात शिरली बट तिच्या केसाची खट्याळपणे उडवून गेली हरपून गेलेली ती आठवूनी जुने क्षण मखमली स्पर्श होता अवखळ वार्‍याचा भानावर आली घेतल्या होत्या आणाभाका धुंद वार्‍यासवे नयनांचा मूक होकार पाहती फुलताटवे वादा केला पक्का जीवन एकमेका अर्पावे परी नशीबांच्या फाशांचे खेळ काय वर्तावे फुलला प्रेमांकुर जुळला स्नेहबंध जुळली मने बांधली होती लग्नगाठ देवाब्राम्हणा साक्षीने उधळल्या होत्या अक्षता स्वागता होती सुमने संसार करु नेटाने दिली घेतली वचने सुखसागरात आकंठ तरती दोन जीव संसारवेल फुलावी हाच मनी भाव कमी काही न पडावे व्हावा सुखवर्षाव लागली नजर कुणाची घातला कुणी घाव? मुसळधार पावसाला सोबत सोसाटी वार्‍याची सुटता लवकर कामावरुनी धरली वाट घरची दबा धरुनी बसलेला काळ करी सोबत त्याची कोसळले झाड घेतली आहुती प्राणाची आणाभाका वचने गेली वार्‍यात वीरूनी एकाकी जगणे आले नशिबी फिरूनी आठवणींचा हिंदोळा हाच ध्यानीमनी झुळूक वार्‍याची घेऊन येई वर्तमानी