दीपत्कार
November 8, 2014 at 9:07am ·
कुत्रा पुराण
आदिम काळापासून कुत्रा हा माणसाचा साथीदार राहिला आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास पुराणकाळातील धर्मराजाची साथ शेवटपर्यंत करणारा कुत्रा तर इतिहासातील शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा होय. श्री दत्तगुरुंच्या कुठल्याही तसबिरीत त्यांच्या आजुबाजूला कुत्रे असतातच. याच कुत्र्यांनी वेगवेगळ्या म्हणी, वाक्प्रचाराद्वारे माणसाच्या बोलीभाषेत, साहित्यात आपला ठसा उमटवला आहे. 'भीक नको पण कुत्रा आवर' , 'आंधळ दळतंय कुत्रं पीठ खातंय' , ' तुला नाही मला नाही, घाल कुत्र्याला', 'समर्थाघरचे श्वान' इत्यादी म्हणी, वाक्प्रचार प्रचलित आहेत. पुलंनी सुद्धा पाळीव कुत्रे व त्यांचे मालक याविषयी विनोदी अंगाने आपले अनुभव मांडले आहेते. इमानी कुत्र्याला केंद्रस्थानी ठेवून चित्रपटांची निर्मितीसुद्धा झालेली आहे. 'राजाने वाजवला बाजा', 'भालू' मराठीत तर हिंदीत 'तेरी मेहेरबानीया' हे चित्रपट आलेले होते. 'अपनी गलीमे तो हर कुत्ता शेर होता है' असेही संवादपण चित्रपटातून ऐकायला मिळतात. धर्मेद्रच्या प्रसिद्ध डायलॉगची सुरूवात तर 'कुत्ते, कमीने' नेच होत असे. मराठीत त्याची फोड 'कुत्ते , कमी ने' अशी करून विनोद तयार केले गेले आहेत. जॉनी लिवर तर आपल्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातील कलाकारांचे त्यांच्याच आवाजात भुंकणारे कुत्रे असा विनोदी प्रयोग सादर करायचे. थोडक्यात या ना त्या प्रकारे 'कुत्रा' ह्या प्राण्याने मानवाचे जीवन व्यापलेले आहे. परंतु भटक्या कुत्र्यामुळे होणार्या त्रासामुळे अशा कुत्र्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली गेली आहे. मध्यंतरी भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो म्हणून त्यांना गोणीत भरून जाळण्याचा राक्षसी प्रयत्न झाला होता. परंतु त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे हे समजून त्यांचा त्रास टाळण्याकरता परिणामकारक उपाययोजना आखल्या गेल्या पाहिजेत.
या सर्व कुत्रापुराणानंतर पाळीव कुत्र्यांच्या मालकांचा एक मुद्दा येथे मांडावासा वाटतो. पाळीव कुत्र्यांना सकाळीच बाहेर फिरायला घेऊन जाणारे कुत्रामालक त्यांच्या कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी केलेल्या विष्ठेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. परंतु माझ्या पाहणीत एक परदेशी महिला कुत्रामालक आली होती. तीसुद्धा सकाळीच कुत्र्याला घेऊन फिरायला निघायची. पण तिचे वेगळेपण यात होते की जर तिच्या कुत्र्याने रस्त्यात घाण केली तर ती टिश्यूपेपरने ती विष्ठा छोट्या पिशवीत भरून आपल्याकडील पर्समध्ये ठेवायची. आज सकाळीसुद्धा अशीच आणखी एक विदेशी महिला कुत्रा फिरवताना दिसली. तिच्या हातातही छोटी पिशवी होती. या दोन्ही महिला त्यांच्या मायदेशी असलेले स्वच्छतेचे नियम भारतातही पाळत होत्या. या उदाहरणावरून भारतीय कुत्रामालक धडा घेतील काय

No comments:
Post a Comment